Site icon रुपयाची कथा

बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आयपीओ: गुंतवणूकदारांनी मोडले सगळे विक्रम!

बजाज हाऊसिंग फायनान्स
बजाज हाऊसिंग फायनान्स

बजाज हाऊसिंग फायनान्स आयपीओ: गुंतवणूकदारांच्या उत्साहाने मोडले विक्रम:

बजाज ग्रुपचे नाव ऐकत आपण अनेक पिढ्यांपासून आलोय, आणि आता त्यांच्याच बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने आपला आयपीओ आणून बाजारात एकच धक्का दिला आहे. 9 सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेला हा आयपीओ, पहिल्या दिवशीच सर्वांच्या अपेक्षांपेक्षा कितीतरी पटीने जास्त यशस्वी ठरला. गुंतवणूकदारांनी इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज केले की, जवळपास 89 लाख अर्ज आले, ज्यामुळे आयपीओ तब्बल 67 पटीने ओव्हर सबस्क्राईब झाला!

बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा परिचय:

बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही कंपनी 2008 साली स्थापन झाली आणि 2015 पासून ती नॅशनल हाऊसिंग बँकच्या अंतर्गत कामकाज करते. कंपनीचे प्रमुख काम म्हणजे ग्राहकांना घर खरेदी, व्यावसायिक जागा खरेदी, मालमत्तेवर कर्ज आणि वैयक्तिक गरजांसाठी कर्ज पुरवणे. विशेष म्हणजे, ही एक नॉन डिपॉझिट टेकिंग कंपनी आहे, म्हणजे ती ग्राहकांकडून कर्ज घेताना कोणताही ठेवी घेत नाही, परंतु ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर आणि आर्थिक स्थिरता तपासून कर्ज देते.

आयपीओच्या तारखा आणि तपशील:

बजाज हाऊसिंग फायनान्स आयपीओ 9 सप्टेंबरपासून सुरू झाला आणि 11 सप्टेंबरला बंद झाला. लिस्टिंगची अपेक्षित तारीख 16 सप्टेंबर आहे. या आयपीओचा प्राइज बँड 66 ते 70 रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आला होता, तर एक लॉट 214 शेअर्सचा होता, ज्यासाठी जवळपास 14,980 रुपये गुंतवावे लागत होते.

हे देखील वाचा: गुंतवणूकीच्या साधनांचे (Investment Instruments) प्रकार, ते कुठे आणि कसे ट्रेड होतात?

आयपीओला मिळालेला जबरदस्त प्रतिसाद:

बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाचे अनेक कारणं आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे, बजाज ग्रुप ही नावाजलेली कंपनी आहे आणि तिचा आयपीओ अनेक गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी होती. बजाज फायनान्स लिमिटेडचा आयपीओ 1994 साली बाजारात आला होता आणि त्यानंतर अनेक वर्षांनी बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ आला. गुंतवणूकदारांसाठी हा एक खास मेजवानीच होती.

बजाज हाऊसिंग फायनान्स आयपीओचा यशस्वी फंडामेंटल स्ट्रक्चर:

बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही फंडामेंटली मजबूत कंपनी आहे. भारताच्या विकासाच्या प्रवासात या कंपनीचा महत्त्वाचा सहभाग आहे, म्हणूनच गुंतवणूकदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. कंपनीला क्रिसिल (रेटिंग देणारी कंपनी ) कडून A1+ रेटिंग मिळाले आहे, जे कंपनीच्या विश्वासार्हतेचे आणि यशाचे प्रमाण आहे.

आयपीओमधील बोनस शेअर्स आणि विक्रीसाठीचे ऑफर:

आयपीओद्वारे कंपनीने 6560 करोड रुपयांचे शेअर्स  इश्यू केले होते, ज्यापैकी 3560 करोड रुपयांचे शेअर्स नवीन इश्यूसाठी होते, तर 3000 करोड रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत उपलब्ध होते. गुंतवणूकदारांनी या संधीचा उत्तम फायदा घेतला आणि 6500 कोटींच्या आयपीओसाठी चक्क 3 लाख कोटींच्या बोली लागल्या.

हे देखील वाचा: इन्व्हेस्टमेंट (Investment) कधी सुरू करावी? करताना कोणती काळजी घ्यावी?

गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे कारण:

शेअर लिस्टिंग आणि शेअर अलॉटमेंट:

आता सगळ्यांचे लक्ष शेअर अलॉटमेंट आणि लिस्टिंग कडे लागले आहे. अर्ज केलेल्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर्स वाटप होईल का? हे पाहणं खूपच रोमांचक ठरेल.

हे देखील वाचा: शेअर बाजारात खरच फायदा होतो का (Is investing in stock market profitable) ? 


FAQ:

1. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड काय करते?
ही एक नॉन डिपॉझिट टेकिंग फायनान्स कंपनी आहे जी ग्राहकांना घर खरेदी, व्यावसायिक जागा खरेदी, आणि मालमत्तेवर कर्ज पुरवते.

2. आयपीओ कधी सुरू झाला?
आयपीओ 9 सप्टेंबर 2024 रोजी सुरू झाला आणि 11 सप्टेंबर 2024 रोजी संपला.

3. आयपीओचा प्राइज बँड किती होता?
आयपीओसाठी प्राइज बँड 66 ते 70 रुपये होता.

4. या आयपीओचे प्रमुख आकर्षण काय होते?
बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडची मजबूत फंडामेंटल्स, बजाज ग्रुपची विश्वसनीयता, आणि आकर्षक प्राइज बँड हे आयपीओचे प्रमुख आकर्षण होते.

5.  आयपीओ किती ओव्हर सबस्क्राईब झाला?
आयपीओ तब्बल 67 पटीने ओव्हर सबस्क्राईब झाला.


शेवटी:
बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खूपच मोठी संधी ठरला आहे. बजाज ग्रुपची यशस्वी कामगिरी आणि त्यांचं नाव ही गुंतवणूकदारांच्या विश्वासाचं मुख्य कारण आहे.


तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा आणि शेअर बाजाराशी निगडीत अजून माहिती  येथे वाचा!

Disclaimer: या लेखातील माहिती केवळ शैक्षणिक आणि सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करा आणि योग्य प्रमाणपत्र असलेल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या. rupayachikatha.com या माहितीच्या अचूकतेसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटच्या यशस्वितेसाठी जबाबदार नाहीत. इन्व्हेस्टमेंटमध्ये जोखीम असते आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. कृपया सावधगिरीने आणि आपल्या जोखमीची क्षमता ओळखूनच इन्व्हेस्टमेंट करा

Exit mobile version