Site icon रुपयाची कथा

निफ्टीची 25400 पर्यंत घोडदौड – करेक्शन येणार का?

निफ्टी
निफ्टी

तू चाल पुढं रं तुला भीती कशाची! – निफ्टीची घौडदौड!

भारतीय शेअर बाजारातील निफ्टी निर्देशांक गेल्या 17 आठवड्यांपासून वाढत आहे. साधारण 21700 पासून त्याने 25400 पर्यंत घौडदौड केली आहे. या प्रवासातील विशेष बाब म्हणजे 17 पैकी फक्त 6 आठवड्यांत निफ्टी निगेटिव्ह बंद झाला, बाकीचे आठवडे बाजारात श्रावणातील हिरवळ दिसून आली आहे.

डिसेंबर 2023 मध्ये  निफ्टी ने पहिल्यांदा 21700 चा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर काही काळ consolidation पाहायला मिळालं. त्यानंतर देशात सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या. तिथे काही अंशी volatility अर्थात अस्थिरता पाहायला मिळाली. निवडणुकीच्या निकालाच्या पूर्वी निफ्टि ने 23300 चा टप्पा गाठला होता. त्यानंतर 4 जून 2024 तारखेला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत होते. त्यादिवशीची volatility खूप जास्त होती. निफ्टि एका दिवसात 23000 पासून 21300 पर्यन्त घसरला. त्यानंतर एक ते दोन दिवस अस्थिरता कायम राहिली. पण आठवडा संपत असताना निफ्टि परत एकदा 23000 च्या उंबरठ्यावर येऊन पोचला होता. पुढचा आठवडा आधीचा All Times High ब्रेक करून परत एकदा सकारात्मकते बंद झाला. त्यानंतर जी खरेदी सुरू आहे ती अजूनही सुरूच आहे.

निवडणूक निकालाच्या आधी 23400 च्या आधी असलेला निफ्टि आता 25400 पर्यन्त आला आहे. दरम्यानच्या काळात अगदी तुरळक प्रमाणात selling pressure अथवा नफावसुली बघायला मिळाली. काही जागतिक बाजारात तर काही स्थानिक पातळीवर विविध घटना घडल्या आणि आर्थिक पाहणी अहवालही येऊन गेला. अशा अनेक छोट्या-मोठ्या अडथळ्यांना पार करत निफ्टि आपली तेजीची वाटचाल सुरूच ठेवत आहे.

इतिहासाचा धडा – निफ्टी लॉकडाऊन नंतर:

मित्रांनो, कोरोंना-लॉकडाउन च्या आधी  निफ्टीचा All Times High 12400 च्या आसपास होता. तिथून आज 5 वर्षांनंतर निफ्टि दुप्पट झाला आहे. हे गणित केलं तर लक्षात येईल की निफ्टि आपल्या नेहमीच्या 14%-15% CAGR ग्रोथ रेट प्रमाणे वाढला आहे. हे सगळं सांगायचं तात्पर्य इतकंच की  निफ्टी दीर्घकाळासाठी थांबत नसतो, तो वाढतच जातो. म्हणूनच आपण आज शीर्षक दिलं आहे तू चाल पुढं रं तुला भीती कशाची!

हे देखील वाचा: SWP: खात्रीशीर मासिक उत्पन्नासाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना!

शेअर बाजारातील तेजीची कारणं:

सध्या शेअर बाजारात जी तेजी सुरू आहे त्याला महत्वाचं कारण आहे DIIs अर्थात Domestic Institutions ची मजबूत खरेदी. 2024 या वर्षात आत्तापर्यंत 3 लाख कोटींहून अधिक पैसा DIIs ने शेअर बाजारात गुंतवला आहे. याउलट FIIs अर्थात परदेशी गुंतवणूकदारांनी 1.25 लाख कोटी पैसा काढून घेतला आहे. याबद्दल आपण सविस्तर माहिती स्वतंत्र ब्लॉग मधून घेणार आहोत.

करेक्शन येणार का?

सध्या शेअर बाजाराच्या बाबतीत विश्लेषक दोन भागात विभागले आहेत. सर्व परिस्थिती आणि फंड फ्लो पाहता मोठं करेक्शन येणार नाही असं काहींचं मत आहे. याविरुद्ध काहीजण म्हणत आहेत की सलगची तेजी आल्यानंतर एक करेक्शन येणं अपेक्षित आहे. त्यासाठी काहीही निमित्त पुरेसं असेल असं त्यांचं म्हणणं आहे. या दोन बाजू आहेत म्हणूनच बाजार सुरळीत सुरू आहे हेही तितकंच खरं आहे. सोबत निफ्टि चा वीकली ग्राफ जोडला आहे. अनेकजण मानतात की  निफ्टी एकदा 20300 आल्याशिवाय राहणार नाही. याबद्दलही तज्ञ मंडळीत मतभेद आहेतच. सलग 17 आठवडे तेजीचे या ग्राफ वर पाहायला मिळतील. काय होणार हे निश्चित कोणीच सांगू शकत नाही. आपला पोर्टफोलियो आपण सांभाळू शकतो इतकंच काय ते आपल्या हातात आहे. तोपर्यंत  निफ्टीला वाढीच्या शुभेच्छा!

निफ्टी

हे देखील वाचा: शेअर बाजारात खरच फायदा होतो का  ? 

फेडचा पतधोरण आणि पुढील आठवड्याचे इव्हेंट:

येत्या आठवड्यात फेड चे पतधोरण जाहीर होईल. त्यात व्याजदर कपात करण्यावर निर्णय अपेक्षित आहे. हा इवेंट शेअर बाजाराला दिशा देणारी ठरू शकते. याशिवाय इकनॉमिक डाटा, महागाईचा डाटा, क्रूड ऑइलच्या किमती अशा काही घटना असतील.

हे देखील वाचा: India VIX वाढला की बाजार पडला! बाजारातल्या अनिश्चिततेचं गणित जाणून घ्या!


FAQ:

  1. DIIs आणि FIIs म्हणजे काय?
    DIIs म्हणजे देशातील संस्थागत गुंतवणूकदार, तर FIIs म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार. यांचा बाजारावर मोठा प्रभाव असतो.
  2. करेक्शन म्हणजे काय?
    करेक्शन म्हणजे बाजारातील अचानक घसरण, जी साधारणपणे 10% किंवा अधिक असू शकते. बाजार दीर्घकाळ तेजीमध्ये असल्यानंतर करेक्शन येणं सामान्य आहे.
  3. करेक्शन आल्यास काय करावं?
    करेक्शन ही लहान मुदतीची घटना असू शकते. अशावेळी घाबरून विक्री न करता दीर्घकालीन गुंतवणूक सांभाळणे चांगले ठरते.

निष्कर्ष:

तू चाल पुढं रं तुला भीती कशाची! कारण निफ्टीसारखा दीर्घकाळासाठी वाढणारा बाजार थांबत नाही, तो सतत पुढं जात राहतो.


तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा आणि शेअर बाजाराशी निगडीत अजून माहिती  येथे वाचा!

Disclaimer: या लेखातील माहिती केवळ शैक्षणिक आणि सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करा आणि योग्य प्रमाणपत्र असलेल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या. rupayachikatha.com या माहितीच्या अचूकतेसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटच्या यशस्वितेसाठी जबाबदार नाहीत. इन्व्हेस्टमेंटमध्ये जोखीम असते आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. कृपया सावधगिरीने आणि आपल्या जोखमीची क्षमता ओळखूनच इन्व्हेस्टमेंट करा

Exit mobile version