आपले भविष्यातील आर्थिक स्थैर्य साध्य करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे एक महत्वाचा टप्पा आहे. परंतु, इन्व्हेस्टमेंट सुरू करण्याआधी काही गोष्टी लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. या लेखात आपण पाहणार आहोत की इन्व्हेस्टमेंट(Investment) कधी सुरू करावी आणि इन्व्हेस्टमेंट(Investment) करताना कोणती काळजी घ्यावी.
इन्व्हेस्टमेंट (Investment) सुरू करण्याचे तीन महत्त्वाचे नियम:
1. लवकर इन्व्हेस्ट करा
पर्सनल फायनान्स विषयी एक साधारण सल्ला दिला जातो तो म्हणजे, शक्य तितक्या लवकर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा. लहान वयात केलेली इन्व्हेस्टमेंट दीर्घकाळात मोठा परतावा देऊ शकते. लवकर सुरू केल्यामुळे तुमच्या इन्व्हेस्टमेंटला जास्त वेळ मिळतो, ज्यामुळे कंपाउंडिंगची ताकद तुमच्या फायद्यात जाते.
उदाहरणार्थ:
जर तुम्ही 10% दराने प्रत्येक महिन्याला ₹10,000 इन्व्हेस्ट केले, तर:
- 3 वर्षांनी: ₹4,17,818
- 6 वर्षांनी: ₹9,81,113
- 9 वर्षांनी: ₹17,40,537
यातून हे स्पष्ट होते की लवकर सुरू केलेली इन्व्हेस्टमेंट भविष्यात मोठा फायदा देऊ शकते.
2. नियमितपणे इन्व्हेस्ट करा
सातत्य आणि शिस्त ही कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्याची गुरुकिल्ली आहे. इन्व्हेस्टमेंटही त्याला अपवाद नाही. नियमितपणे इन्व्हेस्ट करत राहिल्यामुळे तुमच्या आर्थिक ध्येयांपर्यंत पोहोचणे सोपे होते. तुमच्या आर्थिक योजना वेळोवेळी तपासून त्यात आवश्यकतेनुसार बदल करा आणि सतत इन्व्हेस्ट करण्याचे लक्ष ठेवा.
3. योग्य इन्व्हेस्टमेंट(Investment) कालावधी निवडा (लाँग/शॉर्ट टर्म)
इन्व्हेस्टमेंट करताना दीर्घकालीन आणि अल्पकालीन इन्व्हेस्टमेंटचा विचार करा.
- अल्पकालीन इन्व्हेस्टमेंट: जर तुमचे ध्येय लहान आणि कमी जोखमीचे असेल तर अल्पकालीन इन्व्हेस्टमेंट उत्तम ठरू शकते.
- दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट: ज्या व्यक्ती जास्त जोखीम पत्करू शकतात आणि मोठ्या परताव्याची अपेक्षा करतात त्यांच्यासाठी दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट योग्य आहे.
इन्व्हेस्टमेंट(Investment) करताना काय घ्यायची काळजी:
इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींची खात्री करून घेणे आवश्यक आहे:
- इन्व्हेस्टमेंटचे विश्लेषण करणारे लिखित डॉक्युमेंट मिळवा: कोणतेही इन्व्हेस्टमेंट करण्याआधी त्या संबंधीच्या सर्व माहितीचा लिखित पुरावा मिळवा आणि तो व्यवस्थित वाचा.
- कायदेशीर बाजू तपासा: इन्व्हेस्टमेंट सुरक्षित आहे का हे तपासा आणि त्याच्या कायदेशीर बाजूंची पडताळणी करा.
- रिस्क-रिटर्नचे मूल्यांकन करा: प्रत्येक इन्व्हेस्टमेंटमध्ये काही ना काही जोखीम असते. ती जोखीम आणि त्यातील परताव्याचे प्रमाण तपासा.
- इन्व्हेस्टमेंटची लिक्विडिटी: तुमच्या इन्व्हेस्टमेंटची लिक्विडिटी म्हणजेच ती त्वरित परत मिळवण्याची क्षमता काय आहे हे तपासा.
- तुमच्या ध्येयांसाठी योग्य आहे का ते पहा: ही इन्व्हेस्टमेंट तुमच्या आर्थिक ध्येयांना साध्य करण्यासाठी योग्य आहे का याचे मूल्यांकन करा.
- फक्त अधिकृत मध्यस्थीद्वारे डील करा: अधिकृत मध्यस्थाकडूनच इन्व्हेस्टमेंट करा आणि मध्यस्थांची विश्वसनीयता तपासा.
जर तुम्ही वरील सर्व गोष्टींची काळजी घेतली, तर तुमचा इन्व्हेस्टमेंट प्रवास सुरक्षित आणि फायदेशीर होईल.
निष्कर्ष:
इन्व्हेस्टमेंट लवकर सुरू करा, सातत्य ठेवा आणि तुमच्या आर्थिक ध्येयांना साध्य करण्यासाठी योग्य प्रकारचा इन्व्हेस्टमेंट पर्याय निवडा.
तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा आणि शेअर बाजाराशी निगडीत अजून माहिती येथे वाचा!
Disclaimer: या लेखातील माहिती केवळ शैक्षणिक आणि सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करा आणि योग्य प्रमाणपत्र असलेल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या. rupayachikatha.com या माहितीच्या अचूकतेसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटच्या यशस्वितेसाठी जबाबदार नाहीत. इन्व्हेस्टमेंटमध्ये जोखीम असते आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. कृपया सावधगिरीने आणि आपल्या जोखमीची क्षमता ओळखूनच इन्व्हेस्टमेंट करा