स्मार्ट इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्याला विविध प्रकारच्या गुंतवणूकीच्या साधनांची (Investment Instruments) माहिती असणे महत्त्वाचे आहे. तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांनुसार योग्य साधन निवडणे तुमचं आर्थिक भवितव्य ठरवू शकतं. चला तर मग, विविध प्रकारच्या गुंतवणूकीच्या साधनांनवर एक नजर टाकूयात आणि हे इन्स्ट्रुमेंट्स कुठे आणि कसे ट्रेड केले जातात ते जाणून घेऊयात.
1. इक्विटी (Equities)
इक्विटी म्हणजे कंपनीतील तुमचा मालकी हक्क. कंपनीच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करून तुम्ही त्या कंपनीचे भागीदार बनता. इक्विटी होल्डरला नियमित पेमेंट मिळत नाही, पण शेअर्सच्या विक्रीमुळे तुम्हाला कॅपिटल गेन मिळू शकतो. इक्विटीधारकांना डिव्हिडंडही मिळू शकतो, जे कंपनीच्या नफ्यावर अवलंबून असतं.
2. डेब्ट सिक्युरिटीज (Debt Securities)
डेब्ट सिक्युरिटीज म्हणजे तुम्ही कंपनीला किंवा सरकारला दिलेलं कर्ज. यामध्ये तुम्हाला नियमित व्याज मिळतं. यामध्ये दोन प्रमुख प्रकार येतात:
- बाँड्स (Bonds): सरकारी किंवा खाजगी प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी वापरले जातात. हे फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट आहे.
- डिबेंचर्स (Debentures): बाँड्ससारखेच परंतु हे कोणत्याही कोलॅटरलशिवाय असतात.
3. डेरिव्हेटिव्ह (Derivatives)
डेरिव्हेटिव्ह म्हणजे अंतर्निहित मालमत्तेवर आधारित इन्व्हेस्टमेंट. यामध्ये फॉरवर्ड्स, फ्यूचर्स, ऑप्शन्स, आणि स्वॅप्स यांचा समावेश होतो. हे इन्स्ट्रुमेंट्स मुख्यत: कॅपिटल मार्केटमध्ये व्यापार केले जातात.
- फॉरवर्ड्स: दोन पक्षांमधील करार, ज्यात एक विशिष्ट किंमतीवर भविष्यातील तारखेला मालमत्ता एक्सचेंज होते.
- फ्यूचर्स: फ्यूचर डेटला ठराविक किंमतीवर खरेदी किंवा विक्री करण्याचा करार.
- ऑप्शन्स: एक करार जो खरेदीदाराला विशिष्ट संपत्तीसाठी खरेदी किंवा विक्रीचा अधिकार देतो.
- स्वॅप्स: दोन पार्टी दरम्यानचा इंटरेस्ट रेट एक्सचेंजचा करार.
4. एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETFs)
ETFs म्हणजे सिक्युरिटीजचा एक समूह, ज्यात स्टॉक्स, बाँड्स, कमोडिटीज इत्यादींचा समावेश असतो. ETFs स्टॉक एक्सचेंजवर नियमितपणे ट्रेड केले जातात आणि विविध प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्सचा लाभ मिळवण्यासाठी उपयुक्त असतात.
5. म्युच्युअल फंड्स (Mutual Funds)
म्युच्युअल फंड्स म्हणजे विविध इन्व्हेस्टर्सकडून जमा झालेला पैसा, जो इक्विटी, बाँड्स आणि इतर मालमत्तांमध्ये गुंतवला जातो. जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल किंवा रिटायरमेंटसाठी योजना आखायची असेल तर म्युच्युअल फंड हा एक सुरक्षित पर्याय आहे.
गुंतवणूकीच्या साधनांची (Investment Instruments) खरेदी विक्री कुठे केली जाते?
गुंतवणूकीच्या साधनांची (Investment Instruments) मुख्यतः स्टॉक एक्सचेंजवर ट्रेड केले जातात. भारतातील प्रमुख स्टॉक एक्सचेंजेस म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE). या एक्सचेंजेसमध्ये शेअर्स, बाँड्स, आणि इतर फायनान्शियल प्रॉडक्ट्सचा व्यापार होतो.
1. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE)
1875 मध्ये स्थापन झालेले, BSE हे आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे. येथे हजारो कंपन्या लिस्टेड आहेत आणि या एक्सचेंजवरचा सेन्सेक्स इंडेक्स, बाजाराच्या कामगिरीचं मापन करतो.
2. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE)
1992 मध्ये स्थापन झालेले, NSE हे भारतातील पहिले पूर्णपणे कंप्युटराईज्ड स्टॉक एक्सचेंज आहे. निफ्टी 50 इंडेक्सद्वारे हे स्टॉक मार्केट मोजले जाते.
निष्कर्ष
विविध प्रकारच्या गुंतवणूकीच्या साधनांनमध्ये (Investment Instruments) गुंतवणूक करणे, तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याचा महत्त्वाचा भाग असू शकतो. योग्य निर्णय घेण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंट्सचा अभ्यास करा आणि तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांनुसार योग्य साधन निवडा.
तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा आणि शेअर बाजाराशी निगडीत अजून माहिती येथे वाचा!
Disclaimer: या लेखातील माहिती केवळ शैक्षणिक आणि सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करा आणि योग्य प्रमाणपत्र असलेल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या. rupayachikatha.com या माहितीच्या अचूकतेसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटच्या यशस्वितेसाठी जबाबदार नाहीत. इन्व्हेस्टमेंटमध्ये जोखीम असते आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. कृपया सावधगिरीने आणि आपल्या जोखमीची क्षमता ओळखूनच इन्व्हेस्टमेंट करा.