विषयसूची
Toggleतुंबाड! गुंतवणूकदारांसाठी महत्वाचे धडे!
तुंबाड हा बहुचर्चित चित्रपट 6 वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अतिशय वेगळ्या धाटणीचा आणि नवा प्रयोग असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांनी प्रशंसा केली आहे. या चित्रपटाच्या कथेचा मूळ गाभा हा लालच, मोह अर्थात ‘Greed’ हा आहे. चित्रपट पाहिला असेल तर लगेच लक्षात येईल की माणसाचा मोह त्याला सारासार विचारापासून दूर नेतो आणि त्याचा शेवट दयनीय होतो. या चित्रपटातील कथेतून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना बराच बोध घेता येऊ शकतो. आपल्या आजच्या ब्लॉगचा विषयच याभोवती फिरणारा आहे. चित्रपटातील सुरुवातीपासूनचे प्रसंग आणि त्यातून आपण काय बोध घ्यावा याबद्दल आता आपण चर्चा करुयात!
1. सरकार आणि Penny Stocks!
चित्रपटाच्या सुरूवातीला सरकार म्हणून एक वयोवृद्ध गृहस्थ दाखवले आहेत. त्यांच्या वाड्यात गुप्तधन, खजिना आहे हे त्यांना माहिती. त्या खजिन्याच्या शोधात त्यांनी हयात घालवली आहे. शेवटी वृद्धाकाळाने त्यांचा मृत्यू होतो पण हाती खजिना काही लागत नाही.
हे गृहस्थ शेअर बाजारातील त्या गुंतवणूकदारासारखे आहेत जे आयुष्यभर value stock च्या नादात penny stock घेऊन बसतात. कुठलातरी छोटासा शेअर घेऊन सगळी रक्कम त्यात गुंतवतात आणि तो भरमसाठ परतावा देऊन जाईल असं त्यांना वाटत असतं. पण तो शेअर कधीच वाढत नाही आणि मोठी रक्कम कायमस्वरूपी अडकून बसते.
यातून आपल्याला बोध घेता येईल की आपलं गुंतवणूक मूल्य diversified असणं किती गरजेचं आहे. एकाच गुंतवणूक वर्गाच्या मागे लागून खूप श्रीमंत होऊ हा मोह टाळला पाहिजे.
हे देखील वाचा: SWP: खात्रीशीर मासिक उत्पन्नासाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना!
2. विनायक आणि सोन्याचा मोह!
तुंबाड चित्रपटातील मुख्य नायक विनायक लहान असतानापासून त्याला सोन्याच्या मुद्रेचा मोह असतो. त्याच्या आईनेच त्याला याबद्दल सांगितलेलं असतं. त्याच्या डोक्यात प्रत्येक वेळेस खजिना आणि सोन्याची मुद्रा हेच विचार असतात. अगदी मोठ्या दुर्दैवी घटना घडूनही त्याचा तो मोह तसूभरही कमी होत नाही.
आजकाल शेअर बाजाराच्या बाबतीत सर्वत्र चर्चा घडत आहेत. त्यात अल्पवयीन मुलांना याबद्दल वेगळं आकर्षण आहे. काही ठिकाणी आईवडील सुद्धा मुलांचं कौतुक म्हणून त्यांना शेअर बाजार वगैरे सांगतात. लहानपणापासून आर्थिक नियोजनाचे शिक्षण असणं आवश्यक आहेच पण त्यातून काहीतरी घबाड हाती लागेल अशी शिकवण टाळली पाहिजे.
3. मित्राचा मोह आणि त्याचे दुष्परिणाम!
तुंबाड चित्रपटात विनायकराव यांचा व्यवहार एका मित्रासोबत सुरू असतो. त्यांच्या मित्राला मोह होतो की विनायकराव यांना ज्या सोन्याच्या मुद्रा मिळतात त्या आणि तितक्या मलाही मिळाल्या पाहिजेत. त्यातून एक षडयंत्र रचलं जातं आणि अर्थात त्याचा शेवट त्यांच्या मृत्यूतून होतो.
असं म्हणतात की नात्यात, मैत्रित व्यवहार आणू नयेत. कितीही जवळचा मित्र असला तरी व्यवहारात पारदर्शकता आणि नेमकेपणा हवा. आजकाल एकमेकांच्या डिमॅट खात्यावरून ट्रेडिंग करणे, एकत्र पैसे लावणे, एकमेकांची बघून गुंतवणूक करणे असे विषय सर्रास सुरू असतात. हेसुद्धा कुठेतरी टाळले पाहिजे.
हे देखील वाचा: सर्वोत्तम परताव्यासाठी: टॉप-अप SIP टकाटक!
4. पैसा कमावणे नाही, टिकवणे महत्वाचे!
मोह जितका वाईट तितकाच वाईट त्या मोहातून येणारा पैसा! विनायकराव जुन्या वाड्यातून प्रत्येक वेळेस थोड्या थोड्या मुद्रा आणत असतात. त्यांना तसा फायदाही होत असतो. पण येणारं इतकं धन त्यांना राखता येत नाही. परत एकदा पैशांची तंगी सुरू होते.
तुम्ही पैसा किती कमावता यापेक्षा तो कसा टिकवता याला अधिक महत्व असतं. तुम्हाला जो पैसा मिळतो त्याचं योग्य नियोजन करता आलं पाहिजे. त्यातून Retirement Planning, Children Future Planning अशा पद्धतीने गोल्स सेट केले पाहिजेत. हा तुंबाड च्या कथेतून सर्वात महत्वाचा बोध आहे.
हे देखील वाचा: महागाई चा परिणाम: १०, २०, ३० वर्षांनंतर १ कोटी रुपयांचे मूल्य किती असेल?
5. पांडुरंगचा पाठ!
तुंबाड चित्रपटात सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे विनायकरावचा मुलगा पांडुरंग याच्यापासून. विनायकराव वर्षानुवर्षे थोड्या-थोड्या सोन्याच्या मुद्रा आणून आपले शौक पूर्ण करत असतो. पण त्याच्या मुलाचं, पांडुरंगचं डोकं वेगळंच चालतं. एकदाच खूप सार्या सोन्याच्या मुद्रा आणून आयुष्यभराची कमाई करुयात असा त्याचा प्लान असतो. विनायकरावही त्याला भुलतो. पण हा मोह त्यांचा शेवट ठरतो.
शेअर बाजारातून खूप पैसा मिळतो असं मानणारा एक वर्ग आहे. खासकरून तरुण पिढीला असं वाटतं की शेअर बाजार म्हणजे सोन्याचं अंडे देणारी कोंबडी आहे. त्यासाठी मग option trading किंवा इतर मार्ग अवलंबले जातात. मोह, अपुरा अनुभव याचा अंत शेवटी वाईटच असतो. बापाचे एफडी चे पैसे तोडून सगळे पैसे शेअर बाजारात लावणारी पुढची पिढी यातून बोध घेऊ शकते.
हे देखील वाचा: मोठ्या रकमेची गुंतवणूक कशी करावी?
महत्वाचे धडे!
प्रत्येक चित्रपटातून काहीना काही शिकवण दिली जाते. त्यातून आपल्याला काय मिळतं ते आपण निवडायचं असतं. तुंबाड हा चित्रपट आपल्यासारख्या शेअर बाजारातील ट्रेडर्स आणि इन्वेस्टर साठी महत्वाचा संदेश देणारा आहे.
- मोहावर नियंत्रण ठेवणे
- अतिहव्यास टाळणे
- शिस्तबद्ध गुंतवणूक करणे
- Diversified राहणे
- प्रॉपर स्टॉपलॉस लावणे
- योग्य वेळी निर्णय घेणे
हे फॅक्टर्स लक्षात घेणे गरजेचे आहे!
हे देखील वाचा: ऑनलाइन फ्लॅट घ्या, आयुष्यभर घरबसल्या भाडे मिळवा!
FAQ:
1. तुंबाड चित्रपटातून गुंतवणूकदारांना नेमका काय बोध होतो?
तुंबाड हा लालच आणि मोहाच्या परिणामांवर आधारित चित्रपट आहे. गुंतवणूकदारांनी एकाच गुंतवणूक वर्गाच्या मागे लागण्याऐवजी, विविधता असणारी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तसेच मोहाला बळी न पडता, शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून निर्णय घ्यावेत.
2. गुंतवणुकीसाठी विविधता का आवश्यक आहे?
विविधता म्हणजे आपल्या गुंतवणुकीचे विभाजन. एकाच प्रकारातील स्टॉक्स किंवा गुंतवणुकीत पैसे अडकवण्याऐवजी, विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केल्यास जोखीम कमी होते आणि दीर्घकालीन फायदा मिळू शकतो.
3. शेअर बाजारात गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
शेअर बाजारात गुंतवणूक करताना मोहाला बळी न पडणे, योग्य वेळी स्टॉपलॉस लावणे, शिस्तबद्ध नियोजन करणे, आणि विविध क्षेत्रांत गुंतवणूक करून जोखीम कमी करणे आवश्यक आहे.
4. मोहाने शेअर बाजारात नुकसान कसे होते?
मोहामुळे गुंतवणूकदार चुकीचे निर्णय घेतात, एकाच प्रकारात जास्त गुंतवणूक करतात किंवा अत्याधिक जोखीम घेतात. यामुळे बाजारातील चढ-उतारांमध्ये मोठं नुकसान होऊ शकतं.
5. विनायक आणि पांडुरंग यांच्या कथेतील मुख्य धडा काय आहे?
विनायक सतत थोडे थोडे धन मिळवून समाधान शोधत असतो, तर पांडुरंग एकाचवेळेस मोठं धन मिळवण्याच्या मोहात पडतो. शेवटी दोघांचा मोह त्यांचं दयनीय पतन घडवतो.
तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा आणि शेअर बाजाराशी निगडीत अजून माहिती येथे वाचा!
Disclaimer: या लेखातील माहिती केवळ शैक्षणिक आणि सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करा आणि योग्य प्रमाणपत्र असलेल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या. rupayachikatha.com या माहितीच्या अचूकतेसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटच्या यशस्वितेसाठी जबाबदार नाहीत. इन्व्हेस्टमेंटमध्ये जोखीम असते आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. कृपया सावधगिरीने आणि आपल्या जोखमीची क्षमता ओळखूनच इन्व्हेस्टमेंट करा