SWP: खात्रीशीर मासिक उत्पन्नासाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना!

SWP
SWP

SWP म्हणजे काय?

जाणून घ्या अभिषेक सरांच्या ब्लॉगमधून: SWP अर्थात Systematic Withdrawal Plan!  एक अशी Monthly Income Scheme आहे ज्यामध्ये तुम्हाला काहीही कष्ट न घेता Monthly Returns मिळत राहतात. याचं एक साधं-सोपं गणित आहे. SWP मध्ये आपल्याला एकरकमी गुंतवणूक करावी लागते. ही रक्कम Mutual Funds मध्ये गुंतवली जाते. त्यात जे एकूण यूनिट आपल्याला मिळतात त्यातून withdrawal करून आपल्याला दर महिन्याला रक्कम दिली जाते. जोपर्यंत तुम्ही मूळ गुंतवणूक (Invested Capital) आहे तशी ठेवलेली आहे तोपर्यंत Monthly Withdrawal निरंतरपणे मिळत राहतात. शेअर बाजार कितीही कोसळला तरी निश्चित केलेली रक्कम सातत्याने मिळत राहते. याच्यात विशेष सांगायचं म्हणजे जी मूळ रक्कम गुंतवली आहे तिसुद्धा वाढत जाते.

SWP कसे काम करते?

इथे आपण काय केलं? एक रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवली. त्यानंतर Monthly Withdrawal साठी उदाहरण म्हणून महिन्याची 15 तारीख निश्चित केली. प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला थेट बँकेच्या खात्यात रक्कम जमा होणार ज्यासाठी आपल्याला काही करायची गरज नाही. जर 15 तारखेला बँक बंद असतील, सुट्टी असेल तर पुढच्या दिवशी ती रक्कम आपोआप जमा होईल. ही मासिक पेन्शन आपल्याच मूळ गुंतवणुकीतून परत मिळत असते त्यामुळे मूळ गुंतवणूक रक्कम बाजारातील हालचालीनुसार कमी जास्त होताना दिसेल. पण कालांतराने मूळ रक्कम सुद्धा वाढतच जाते.
थोडासा गोंधळ होतोय का? हरकत नाही. शेवटी आपण एक वास्तविक उदाहरण घेऊन सर्व जाणून घेणार आहोतच. तत्पूर्वी ही प्रक्रिया समजून घेऊयात!

SWP! India’s Best Pension Plan!

या SWP योजनेला तुम्ही Retirement Plan म्हणून बघू शकता. बर्‍याचदा नोकरीतून निवृत्त झाल्यावर एकरकमी पैसा येत असतो. त्याचं योग्य नियोजन कसं करावं हे अनेकांना माहिती नसतं. त्यातूनच मग ही रक्कम कुठेतरी बँकेतील एफडी अथवा पोस्टल योजना अथवा काहीतरी भलत्याच ठिकाणी पैसा गुंतवला जातो. तिथे 8% पेक्षा अधिकचा परतावा मिळण्याची शक्यता अजिबातच नसते. शिवाय त्यातून येणार्याण व्याजावर टीडीएस सुद्धा जातो. म्हणजे जेमतेम 6 ते 7 टक्के परतावा घेऊन शांत बसावं लागतं. या सर्व Asset Class पेक्षा SWP ही उजवी ठरते. उदाहरण म्हणून एका दर्जेदार Mutual Fund द्वारे केलेली SWP पाहुयात!

SWP
SWP

सदरील Mutual Fund मध्ये 2002 साली एकरकमी 25 लाख रुपये गुंतवले आणि महिन्याला 18,750 रुपये पेन्शन पद्धतीने मिळवत राहिलो तर काय झालं आहे याबाबतचा तक्ता खाली जोडला आहे. वीस वर्षाचा कालावधी पाहिला तर आश्चर्यचकित करतील असा परतावा मिळाला आहे. दरम्यानच्या काळात 18,750 Monthly Withdrawal प्रमाणे 48,00,000 रुपये पेन्शन मिळाली असती आणि आणि आणि आज मूळ गुंतवणुकीची VALUE ही 11 कोटी इतकी असती! आता पहिला विचार मनात येतो की ‘काय फेकतोय!’ पण त्यासाठीच जे घडणार आहे ते सांगण्यापेक्षा जे घडलं आहे तो Past Performance दाखवल आहे.

SWP
SWP

खात्री व सुरक्षितता?

अशा भरभक्कम परताव्याच्या योजना सांगितल्या की त्याच्या वैधतेबाबत आणि सुरक्षिततेबाबत प्रश्न असतात आणि ते रास्त आहे. पण SWP ही सेबी (SEBI) अधिकृत आणि सरकारमान्य वैध प्रक्रिया आहे. इथे कसलीही चैन मार्केटिंग अथवा मेंबर्स जोडा हा प्रकार नाही. हा अतिशय साधा आर्थिक नियोजनाचा मार्ग आहे. यामध्ये महिन्याला जी रक्कम मिळते ती कुठल्याही परिस्थितीत मिळताच राहणार आहे. अगदी 2008 च्या जागतिक मंदीत आणि 2020 च्या कोरोंना मधील मार्केट क्रॅश मध्येही Monthly Withdrawal सुरूच राहिलं.

हे देखील वाचा: १०, २०, ३० वर्षांनंतर १ कोटी रुपयांचे मूल्य किती असेल?

 

एकरकमी गुंतवणूक गरजेची असते का?

हो! SWP अथवा Pension Plan सुरू करण्यासाठी एकरकमी गुंतवणूक गरजेची असते. पण याचा अर्थ असा नाही की ज्यांच्याकडे एकत्रित रक्कम नाही ते SWP चा विचार नाही करू शकत. ज्यांचं वय आज कमी आहे आणि Retirement साठी अजून वेळ आहे त्यांनी आत्तापसून SIP द्वारे गुंतवणुकीला सुरुवात करावी आणि मोठा Corpus तयार करावा आणि ज्यावेळी रिटायरमेंट होईल त्यावेळी त्यातून SWP द्वारे Monthly Withdrawal सुरू करावेत! त्यासाठी या ठरवून दिलेल्या फंडमध्ये खालील प्रमाणे SIP करू शकता.

  •  या फंडमध्ये दरमहा 5000 रुपये 15 वर्षे सातत्याने गुंतवणूक की तर 30 लाख value होईल आणि monthly 20,000 पेन्शन मिळेल.
  •  या फंडमध्ये दरमहा 5000 रुपये 20 वर्षे सातत्याने गुंतवणूक केली तर 68 लाख value होईल आणि monthly withdrawal पेन्शन 45,000 असेल.
  • या फंडमध्ये दरमहा 5000 रुपये 25 वर्षे सातत्याने गुंतवणूक केली तर जवळपास 1.25 कोटी value होते आणि महिन्याला पेंशन 80,000 रुपये इतकी मिळते.
  • या फंडमध्ये दरमहा 5000 रुपये 30 वर्षे सातत्याने गुंतवणूक केली तर जवळपास 3 कोटी value होते आणि महिन्याला पेंशन 2,00,000 रुपये इतकी मिळते.
हे देखील वाचा :  सेव्हिंग्स vs. इन्व्हेस्टमेंट (savings Vs investment): भविष्यातील फायनान्शियल निर्णय कसे घ्यावेत?

SWP बद्दल काही फायदेशीर बाबी:

  1. बँकेतील 8% परताव्यापेक्षा चांगला परतावा
  2. मूळ गुंतवणूक रकमेला कसलाही Locking नाही
  3.  कुठल्याही परिस्थितीत Monthly Withdrawal वर परिणाम नाही
  4. नॉमिनेशन व ट्रान्सफरची सोपी प्रक्रिया
  5.  एकदा गुंतवणूक केल्यानंतर काहीही करण्याची गरज नाही
  6. एका क्लिकवर मोबाइलमध्ये गुंतवणूक ट्रॅक करता येते
हे देखील वाचा: ऑनलाइन फ्लॅट (Online Flat) घ्या, आयुष्यभर घरबसल्या भाडे मिळवा!

 

कोणासाठी फायदेशीर?

  1. ज्यांना निवृत्तीनंतर Monthly Pension पाहिजे
  2. एकत्रित मोठी रक्कम आली आहे आणि त्याचं नियोजन करायचं आहे
  3. गुंतवणूक म्हणून फ्लॅट / घर वगैरे घ्यायचं आहे अशांना तर ही पर्वणीच आहे. 25 लाखाच्या फ्लॅटला 20 हजार भाडं कोणीही देणार नाही ते इथे घरबसल्या मिळेल. कसलंही मेंटेनन्स नाही. फ्लॅटची किंमत वाढते तशी मूळ गुंतवणूक वाढते.
  4. आपली संपत्ति पुढील पिढीला हस्तांतरित करायची आहे अशांना SWP फायद्याची आहे.
  5. ज्यांना आपल्या मुलामुलीला, पत्नीला, आईला, वडलांना, बहिणीला किंवा ज्याला Lifetime Earning Source मिळवून द्यायचा आहे अशांसाठीही ही योजना उपयुक्त ठरते.

हे सगळं गणित बर्याचचदा किचकट आणि अशक्यप्राय वाटतं. पण हे सहज शक्य आहे आणि अगदी छातीठोकपणे सांगू शकतो की हे करता येतं. यापूर्वीचा डाटाही त्यासाठी प्रमाण मानता येईल. याबद्दल काही शंका असतील किंवा काही विचारायचं असेल तर चांगल्या आर्थिक सल्लागार अथवा म्युच्युअल फंड वितरकाला भेटून आपल्या शंका विचारू शकता किंवा आम्हाला संपर्क करू शकता.

हे देखील वाचा: मोठ्या रकमेची गुंतवणूक (Investment) कशी करावी?

तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा आणि शेअर बाजाराशी निगडीत अजून माहिती  येथे वाचा!

Disclaimer: या लेखातील माहिती केवळ शैक्षणिक आणि सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करा आणि योग्य प्रमाणपत्र असलेल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या. rupayachikatha.com या माहितीच्या अचूकतेसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटच्या यशस्वितेसाठी जबाबदार नाहीत. इन्व्हेस्टमेंटमध्ये जोखीम असते आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. कृपया सावधगिरीने आणि आपल्या जोखमीची क्षमता ओळखूनच इन्व्हेस्टमेंट करा

Scroll to Top