ऑनलाइन फ्लॅट (Online Flat) घ्या, आयुष्यभर घरबसल्या भाडे मिळवा!

Online Flat SWP
Online Flat SWP

बरेचजण गुंतवणूक म्हणून फ्लॅट किंवा घर वगैरे स्थावर मालमत्ता घेत असतात. त्यांना त्यातून दर महिन्याला रेग्युलर उत्पन्न मिळेल आणि भविष्यात त्या प्रॉपर्टीच्या किमतीत वाढ होईल अशी अपेक्षा असते. त्यासाठी मग ते बराच विचार करतात आणि फ्लॅट, घर अशी प्रॉपर्टी घेतात. काहीजण कर्ज काढूनही अशा प्रकारची गुंतवणूक करतात. त्यात टॅक्स वाचवणे हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. काही जणांकडे एकरकमी मोठी रक्कम असते जी ते अशा स्थावर मालमत्तेच्या मार्फत गुंतवत असतात.

पण आज आम्ही असा एक ‘ऑनलाइन फ्लॅट (Online Flat SWP) ’ या संकल्पनेबाबत सांगणार आहोत, की जो फार कमी सर्वसामान्य गुंतवणूकदाराला माहीत असेल. त्यासाठी आधी एक उदाहरण पाहुयात!

गुंतवणुकीचे उदाहरण:

  • गुंतवणूक रक्कम: 50 लाख
  • दर महिना भाडे स्वरूपात मिळणारी रक्कम: 30,000 (फिक्स. कुठल्याही परिस्थितीत भाडे मिस होणार नाही.)
  • साधारणपणे 15 वर्षांनंतर ऑनलाइन फ्लॅटची किंमत: 1.35 कोटी
  • टॅक्स: ज्यावेळी तुम्ही ऑनलाइन फ्लॅट विक्री कराल, तेंव्हाच लागणार.
  • लॉकिंग पिरेड: कसलाही लॉक-इन पिरेड नाही. पाहिजे तेंव्हा पैसे काढून घेऊ शकता.
  • कर्ज उपलब्धता: या 50 लाखांवर कधीही कर्ज उपलब्ध होऊ शकतं. त्यातून करबचतीचा मार्गही आहेच.

हे देखील वाचा : इन्व्हेस्टमेंट (Investment) कधी सुरू करावी? करताना कोणती काळजी घ्यावी? 

ऑनलाईन फ्लॅटची (Online Flat SWP) विशेषता:

साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, तुम्ही आज 50 लाख रुपये ‘ऑनलाइन फ्लॅट’ मध्ये गुंतवणूक केली, की पुढील महिन्यापासून तुम्हाला घरबसल्या थेट तुमच्या बँकेच्या खात्यात ठरवलेल्या तारखेला भाडे मिळणार आहे. कोणाकडे पैसे मागायला जायची गरज नाही किंवा इतर काही अडचण येणार नाही. शेअर मार्केट कुठेही कसेही असेल किंवा कोरोना सारखी आपत्ति आलेली असली, तरीही तुम्हाला मिळणार्‍या भाड्यामध्ये कसलाही खंड पडणार नाही.

ऑनलाइन फ्लॅटची Liquidity: पैसे काढणे सोपे आणि जलद

दूसरा मुद्दा आहे Liquidity चा! म्हणजे, तुम्हाला पाहिजे तेंव्हा तुम्ही ही रक्कम काढून घेऊ शकता. जसं सामान्यपणे घर, फ्लॅट वगैरे विकायचे असेल, तर तुम्हाला गिर्हाइक शोधत बसावे लागतात. त्यानंतर डील होते, मग प्रोसेस होते, आणि मग काही महिन्यांनी पैसे मिळतात. इथे असे काहीही करावे लागणार नाही. अवघ्या 2-3 वर्किंग डेज मध्ये पैसे बँकेत येतात. पाहिजे तेंव्हा एका क्लिकवर ‘ऑनलाइन फ्लॅट’ विकू शकता आणि दोन-तीन दिवसात तुमची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

इथे जोखीमही आहे, की तुम्ही फ्लॅट विकत असताना शेअर बाजार खूप कोसळलेला असेल, तर तुम्हाला ‘नकारात्मक परतावा’ मिळू शकतो म्हणजे तुमचा लॉस होऊ शकतो. पण साधारणपणे 5 वर्षांनंतर ही शक्यता नगण्य (Negligible) असते.

हे देखील वाचा : महागाई (Inflation) चा परिणाम: १०, २०, ३० वर्षांनंतर १ कोटी रुपयांचे मूल्य किती असेल?

ऑनलाईन फ्लॅटची (Online Flat SWP) विक्री आणि देखभाल:

तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, हा ‘ऑनलाइन फ्लॅट’ मिळवण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी तुम्हाला फार काही धावाधाव करावी लागणार नाही. फार कसले कागदपत्रे जमा करावी लागणार नाहीत. या ‘ऑनलाइन फ्लॅट’ ला कसलाही मेंटेनन्स नाही. हा ‘ऑनलाइन फ्लॅट’ कधीच ‘आऊट ऑफ फॅशन’ होणार नाही.

एका वाक्यात सांगायचं तर “तुमच्या पैशांचा सन्मान करणारी ही गुंतवणूक असेल!”

हे देखील वाचा : सर्वोत्तम परताव्यासाठी: टॉप-अप SIP टकाटक!

Online Flat SWP

सामान्य फ्लॅट खरेदी करताना विचार करावा लागणारे मुद्दे:

जर तुम्ही नॉर्मल माणसाप्रमाणे नॉर्मल फ्लॅट घेत असाल, तर खालील मुद्द्यांचा विचार करा:

  1. साधारणपणे 50 लाखांच्या नॉर्मल फ्लॅटला 15,000 रुपयांपेक्षा जास्त भाडे मिळणार नाही. 
  2. सदासर्वकाळ भाडेकरू असेलच असे नाही. कधी कधी वर्षभर हे फ्लॅट रिकामे राहतात. 
  3. भाडेकरू वेळेवर भाडे देईलच असे नाही. त्याच्या मागे लागावं लागेल.
  4. नॉर्मल फ्लॅटला मेंटेनन्स असतो. मेन्टेनन्स चार्जेस, मुनिसिपल चार्जेस, वॉटर चार्जेस, सोसायटी चार्जेस वगैरे तुम्हालाच द्यावे लागतात.
  5. नॉर्मल फ्लॅट खरेदी करताना बर्‍याच गोष्टी पाहाव्या लागतात. पजेशनच्या वेळी होणारी टाळाटाळ, मुनिसिपालटीमध्ये नाव लावताना होणारा त्रास, प्रॉपर्टी कार्डवर नाव लावताना होणारा त्रास, यावर कहर म्हणून बांधकामाचा निकृष्ट दर्जा, पुण्यात असेल तर सेक्रेटरीचा जाच अशा बाबी मनस्ताप देतात.
  6. नॉर्मल फ्लॅट विक्रीच्या वेळेस लिक्विडिटीचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे तुम्हाला अगदी अर्जंट फ्लॅट विकून पैसे हवे असतील, तर समोर गिर्हाइक तयार असेलच असे नाही. तुम्हाला शोधाशोध करत बसावी लागेल आणि महिन्याभराने त्या नॉर्मल फ्लॅटला गिराईक मिळालं नाही, तर पडत्या किमतीला तो विकावा लागेल.
  7. 15-20 वर्षांनी ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या नॉर्मल फ्लॅट कडे बघाल, त्यावेळेस तो Outdated झालेला असेल. एकेकाळी attached toilet, swimming pool, parking area या बाबी महत्वाच्या नव्हत्या, पण आज त्या असल्याशिवाय आपण फ्लॅट घेतच नाहीत. अजून 15 वर्षांनी आजच्या लेव्हीश फ्लॅटला काय मागणी असेल, तुम्हाला सांगता येणार नाही.

हे देखील वाचा : सेव्हिंग्स vs. इन्व्हेस्टमेंट: भविष्यातील फायनान्शियल निर्णय कसे घ्यावेत?

‘ऑनलाईन फ्लॅट’ (Online Flat SWP) संकल्पनेची ओळख:

ही जी काही ‘ऑनलाइन फ्लॅट’ म्हणून संकल्पना सांगितली आहे, ती काही नवीन संकल्पना नाही किंवा कुठली अनधिकृत स्कीम वगैरे नाही. या गुंतवणुकीला SWP अर्थात Systematic Withdrawal Plan म्हणतात. याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल, तर आमच्या पुढच्या पोस्टमध्ये आपल्याला सविस्तर वाचता येईल! तोपर्यंत ‘रुपयाची कथा’ वाचत रहा!


वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):

1. ऑनलाइन फ्लॅट म्हणजे नेमकं काय?
ऑनलाइन फ्लॅट म्हणजे एक प्रकारचा गुंतवणुकीचा पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्ही निश्चिंत भाडे मिळवण्यासाठी Systematic Withdrawal Plan (SWP) द्वारे रक्कम गुंतवू शकता.

2. यामध्ये कसलाही लॉक-इन पिरेड नसतो का?
होय, या गुंतवणुकीत कसलाही लॉक-इन पिरेड नसतो. तुम्हाला पाहिजे तेंव्हा गुंतवलेली रक्कम काढून घेऊ शकता.

3. ऑनलाइन फ्लॅटमध्ये भाडे मिळण्याची खात्री किती आहे?
तुम्हाला दर महिन्याला ठरलेली रक्कम भाड्याच्या स्वरूपात खात्रीने मिळेल, अगदी शेअर मार्केट कोसळले तरीही.

4. गुंतवणुकीत लिक्विडिटी किती आहे?
ऑनलाइन फ्लॅट्समध्ये अत्यंत लवचिक लिक्विडिटी असते. तुम्ही फ्लॅट विकू शकता आणि 2-3 वर्किंग डेजमध्ये पैसे मिळवू शकता.

5. या गुंतवणुकीत जोखीम किती आहे?
तुम्हाला फ्लॅट विकत असताना शेअर बाजार कोसळला असेल, तर नकारात्मक परतावा मिळू शकतो. मात्र, साधारणपणे 5 वर्षांनंतर जोखमीचे प्रमाण खूप कमी असते.

6. SWP म्हणजे काय?
SWP म्हणजे Systematic Withdrawal Plan.

तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा आणि गुंतवणूक संबंधित अजून माहिती  येथे वाचा!
Disclaimer:

या लेखातील माहिती केवळ शैक्षणिक आणि सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करा आणि योग्य प्रमाणपत्र असलेल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या. rupayachikatha.com या माहितीच्या अचूकतेसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटच्या यशस्वितेसाठी जबाबदार नाहीत. इन्व्हेस्टमेंटमध्ये जोखीम असते आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. कृपया सावधगिरीने आणि आपल्या जोखमीची क्षमता ओळखूनच इन्व्हेस्टमेंट करा.

 

Scroll to Top