ठळक
-
‘लाडकी बहीण योजने’चा पहिला हप्ता कोणत्या तारखेला होणार जमा?
-
लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्तात किती पैसे मिळणार?
Mazi Ladki Bahin Yojana Installment : महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केल्यापासून महिलांचा या योजनेला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच, 31 ऑगस्टपर्यंत महिलांना योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे तसेच महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यात ही योजना मदत करेल. राज्य सरकारकडून देण्यात येणारी 1500 रुपयांची आर्थिक मदत थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आता या सर्वात अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की पहिला हफ्ता कधी आणि किती रूपयांचा मिळणार आहे?
माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान पहिला हप्ता मिळेल अशी शाश्वती देण्यात आली आहे . या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी 1500+1500 असे दोन महिन्यांचे मिळून 3000 रुपये जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा एकत्रित हप्ता म्हणजेच 3 हजार रुपये रक्षाबंधनाच्या दिवशी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होतील.
किती अर्ज दाखल ? किती मंजूर ?
आतापर्यंत 1 कोटी 60 लाख महिलांनी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केला आहे . त्यापैकी 1 कोटी 27 लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
प्रलंबित अर्ज आणि नामंजूर झालेल्या आर्जांचे काय करणार सरकार?
प्रलंबित अर्जांमधील काही त्रुटी दुरुस्त करुन ते मंजूर केले जाणार असल्याची माहिती आहे.
अधिक माहितीसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या!
तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा आणि शेअर बाजाराशी निगडीत अजून माहिती येथे वाचा!
Disclaimer: या लेखातील माहिती केवळ शैक्षणिक आणि सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करा आणि योग्य प्रमाणपत्र असलेल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या. rupayachikatha.com या माहितीच्या अचूकतेसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटच्या यशस्वितेसाठी जबाबदार नाहीत. इन्व्हेस्टमेंटमध्ये जोखीम असते आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. कृपया सावधगिरीने आणि आपल्या जोखमीची क्षमता ओळखूनच इन्व्हेस्टमेंट करा.