मोठ्या रकमेची गुंतवणूक (Investment) कशी करावी?

Investment
Investment

निवृत्तीनंतर अनेक लोकांना एकरकमी रक्कम मिळते, किंवा काही लोकांना स्थावर मालमत्ता विकल्यानंतर मोठी रक्कम हाती येते,  प्रत्येकाला एकच गुंतवणूक (Investment) पर्याय फायदेशीर ठरेल असे नाही.  अशा परिस्थितीत मोठ्या रकमेचे योग्य आर्थिक नियोजन कसे करायचे, हे समजून घेण्यासाठी आजचा हा लेख आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या आर्थिक गरजा वेगवेगळ्या असतात. कोणाला घर घ्यायचं असतं, कोणाला मुलांची लग्न असतात, कोणाला उर्वरित आयुष्याची तजवीज करायची असते तर कोणाला अजून काही गोल्स असू शकतात. प्रत्येकासाठी विविध गुंतवणूक पर्याय असतील. आपण त्यातीलच आज काही जाणून घेणार आहोत.
त्यासाठी उदाहरण म्हणून असं गृहीत घेऊ की ६० वर्षांचे अभिषेकी काका आत्ताच निवृत्त झाले आहेत आणि त्यांच्याकडे एकूण 25 लाख रुपये आहेत ज्याचं आर्थिक नियोजन त्यांना करायचं आहे.


Diversification आणि Balanced Investment:

सर्वात आधी आपण असा विचार करुयात की या रकमेला आपल्याला Diversification करत आणि Balanced पद्धतीने गुंतवायचे आहे. त्यासाठी मग एकूण २५ लाखांपैकी १० लाख रुपये अभिषेकी काका स्वतःच्या नावे Mutual Funds मध्ये गुंतवून त्यातून मंथली इन्कम म्हणून SWP करू शकतात. यातून आपल्याला दरमहिना सातत्याने ७००० रुपये आयुष्यभर पेन्शन मिळत राहील आणि मूळ १० लाखांची गुंतवणूक (Investment) मूल्य वाढत राहील. ही रक्कम पुर्णपणे अभिषेकी काकांच्या नावे राहील आणि त्यांच्यानंतर त्यांच्या वारसाला हस्तांतरित होईल.

कर नियोजन:

यातून टॅक्स चा फायदा असा आहे की अभिषेकी काकांना Tax Slab नुसार कर द्यावा लागणार नाही. पहिल्या वर्षी नफ्याच्या २०% STCG कर द्यावा लागेल जो किरकोळ असतो आणि पुढील वर्षापासून नफ्याच्या १२.५% कर द्यावा लागेल ज्यात १.२५ लाखांपर्यंत सूट आहे.

Children’s Mutual Fund :

त्यानंतर आपण ५ लाख रुपये अभिषेकी काकांनी नातवाच्या/नातीच्या नावाने Children’s Mutual Fund मध्ये गुंतवायचा निर्णय घेतला. हे एक प्रकारे नातवाला/नातीला दिलेलं गिफ्ट असेल. या गुंतवणुकीचा लाभ असा की नातू/नात १८ वर्षांची होताच त्यांच्या हातात मोठी रक्कम येते ज्यातून त्यांचा शिक्षणाचा खर्च निघून जातो. या मार्गाने सुद्धा अभिषेकी काका Tax Planning करत सूट मिळवू शकतात.

Senior Citizen Saving Scheme:

आता उरले १० लाख. त्यातील ५ लाख रुपये अभिषेकी काकांनी स्वतःच्या नावे Senior Citizen Saving Scheme मध्ये पोस्ट अथवा बँकेत गुंतवले. त्यातून चांगलं व्याज मिळतं, मूळ रकमेला कसलेही fluctuation नाही आणि पाहिजे तेंव्हा पैसे काढण्याचे स्वातंत्र्य आहे. शिवाय त्यातील रक्कम ही मार्केट लिंकड नसल्याने एक प्रकारे diversification होतं.

थेट शेअर्समध्ये गुंतवणूक:

उर्वरित ५ लाखांसाठी अभिषेकी काकांकडे बरेच पर्याय आहेत. जर त्यांची थोडीशी जोखीम घेण्याची तयारी असेल तर सल्लागारच्या मदतीने थेट शेअर बाजारात गुंतवणूक करू शकता जिथे चांगला परतावा मिळू शकतो. तिथे उर्वरित पर्यायांच्या मानाने चांगला परतावा मिळू शकतो पण जोखीमही तितकीच असणार आहे. पण जर ते जोखीम घेऊ इच्छित नसतील तर मग त्यांच्याकडे गोल्ड किंवा इन्शुरन्स असे काही पर्याय आहेत. आपल्या गरजेनुसार आणि भविष्याचा विचार करता ते त्याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात.

प्रत्येकाची आर्थिक गरज वेगळी असते आणि त्यानुसार या बाबी बदलू शकतात. हे मूळ गुंतवणूक वर्ग आहेत आणि याला वगळता अजूनही काही पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत.

आर्थिक नियोजनाच्या सल्लागाराची भूमिका:

चांगला गुंतवणूक सल्लागाराच्या साथीने आपण आर्थिक नियोजन करू शकता.

भविष्यातील गुंतवणूक पर्याय:

कालानुरूप सर्व क्षेत्रात बदल होत आहेत आणि होत जातील. आपण निश्चित स्वरूपात काही मार्ग शोधून त्यातून आर्थिक गोल साध्य करू शकतो.

गुंतवणूक संबंधित प्रश्न आणि उत्तरे (FAQs)

  1. मोठ्या रकमेची गुंतवणूक करताना कोणते गुंतवणूक पर्याय उत्तम असतात?
    विविधीकरण करून म्युच्युअल फंड, सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम, आणि सुरक्षितता प्रधान योजनांचा विचार करावा.
  1. Senior Citizen Saving Scheme मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे काय आहेत?
    सुरक्षितता, स्थिर व्याज, आणि मार्केट फ्लक्चुएशनपासून संरक्षण हे प्रमुख फायदे आहेत.
  2. म्युच्युअल फंडातून मासिक उत्पन्न कसे मिळते?
    SWP (Systematic Withdrawal Plan) द्वारे म्युच्युअल फंडातून मासिक उत्पन्न मिळवता येते.
  3. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास काय काळजी घ्यावी?
    शेअर बाजारात गुंतवणूक करताना जोखीम ओळखणे आणि योग्य सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
  4. मुलांच्या शिक्षणासाठी चिल्ड्रेन्स म्युच्युअल फंड कसा उपयोगी आहे?
    चिल्ड्रेन्स म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेली रक्कम मुलांच्या शिक्षणासाठी भविष्यात वापरता येते.
  5. गुंतवणूक करताना कर नियोजनाचे महत्व काय आहे?
    कर नियोजनाद्वारे गुंतवणूक परतावा वाढवता येतो आणि अनावश्यक कर भार कमी करता येतो.

निष्कर्ष:

मोठ्या रकमेचे योग्य आर्थिक नियोजन करून दीर्घकालीन स्थैर्य साध्य करणे शक्य आहे. विविध गुंतवणूक पर्यायांचा विचार करून योग्य वेळेत गुंतवणूक केल्यास आपल्या वित्तीय उद्दिष्टांपर्यंत पोहोचता येते.

तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा आणि गुंतवणूक संबंधित अजून माहिती  येथे वाचा!
Disclaimer:

या लेखातील माहिती केवळ शैक्षणिक आणि सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करा आणि योग्य प्रमाणपत्र असलेल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या. rupayachikatha.com या माहितीच्या अचूकतेसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटच्या यशस्वितेसाठी जबाबदार नाहीत. इन्व्हेस्टमेंटमध्ये जोखीम असते आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. कृपया सावधगिरीने आणि आपल्या जोखमीची क्षमता ओळखूनच इन्व्हेस्टमेंट करा.

 

Scroll to Top