INDIA VIX: शेअर बाजारातील अनिश्चितता ओळखण्याचा महत्वाचा निर्देशांक
चंचलतेचा निर्देशांक! हा वाढला की बाजार पडला! आजपर्यंत आपण विविध इंडेक्स बघितले असतील. जसे की Nifty, Sensex, Banknifty इत्यादि. पण एक महत्वाचा इंडेक्स असतो जो मार्केट ट्रेडर्सला माहिती असणं अपेक्षित आहे. खासकरून डे ट्रेडर्स किंवा ऑप्शन ट्रेडर्ससाठी हा फार महत्वाचा संदेश देणारा असतो. याच्या आधारावर आपल्याला बाजारात येणार्या ‘तुफानाची’ माहिती मिळू शकते. तो Index आहे INDIA VIX!
INDIA VIX म्हणजे काय?
INDIA VIX हा शेअर बाजारातील अस्थिरता (Volatility) दर्शवतो. म्हणून याला “Volatility Index” असे म्हणतात. या Index च्या आधारावर निफ्टि एक महिन्यात किती ‘अस्थिर’ होऊ शकतो हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. एक प्रकारे हा अनिश्चितता इंडिकेट करत असतो असं म्हंटलं तरी हरकत नाही. सध्या INDIA VIX हा 14 च्या आसपास आहे. याचा अर्थ असा की 30 दिवसात निफ्टिमध्ये 14% पर्यन्त volatility, fluctuations येऊ शकते. म्हणजे निफ्टि आहे त्या प्राइसला स्थिर राहणार नाही असच त्याचं indication आहे.
हे सुद्धा वाचा! स्टॉक मार्केट (Stock Market Index) इंडेक्स म्हणजे काय?
INDIA VIX निर्देशांक कसा काम करतो?
सामान्यपणे अशी अस्थिरता ही काही महत्वाच्या इवेंट, न्यूजच्या पार्श्वभूमीवर तयार होते. म्हणजे, निवडणूक निकाल असतील, अर्थसंकल्प असेल, फेडची महत्वची बैठक असेल किंवा अगदी कोरोंना सारख्या महामारीच्या बातम्या असतील. हे व असे सर्व इवेंट भविष्यातील आर्थिक घडामोडींवर प्रभाव टाकू शकतात आणि त्यानंतरच अर्थव्यवस्थेला दिशा मिळू शकते असं गणित असतं. पण त्या इवेंट मधून Outcome येईपर्यंत सर्वकाही अधांतरी, अनिश्चित आहे आणि त्याला दिशा नाही असं गुंतवणूकदार मानतात. हीच अनिश्चितता आकड्यांच्या स्वरुपात INDIA VIX दर्शवत असतो.
INDIA VIX चा प्रभाव: निवडणुकांपासून महामारीपर्यंत
INDIA VIX निर्देशांकाच्या अनिश्चिततेच्या गणिताचा परिणाम कसा होतो हे पाहूया. अगदी अलिकडचे उदाहरण द्यायचे झाले तर लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी, 4 जूनला, India VIX वाढून थेट 28 पर्यन्त पोचला होता आणि निफ्टि आणि एकंदरीतच शेअर बाजार मोठ्या प्रमाणात आणि कमी कालावधीत कोसळला होता. हीच त्याची अनिश्चितता दाखवण्याची वृत्ती आहे!
INDIA VIX वाढला की बाजार का पडतो?
इतिहासात पाहता, ज्या वेळी INDIA VIX वाढतो, त्यावेळी निफ्टी आणि बाजार पडण्याची शक्यता अधिक असते. कारण अनिश्चितता म्हणजे भीती आणि ही भीती गुंतवणूकदारांना बाजारातून पैसे काढून घेण्यास प्रवृत्त करते. तुम्ही हे स्वतः स्क्रीनवर चेक करू शकता. तुमच्या ट्रेडरच्या अप्प्लीकेशन वर अथवा Moneycontrol सारख्या वेबसाइटवर तुम्हाला INDIA VIX हा निर्देशांक दिसून जाईल. त्याकडे लक्ष ठेवा आणि त्यानुसार निफ्टि आणि बाजारावर होणारे परिणामही नोंदवू शकता.
कोरोना महामारीच्या काळातील अस्थिरता: एक रंजक इतिहास:
इतिहास काय सांगतो… वेल, इतिहास फार रंजक असतो. सर्वांनी कोरोंना आणि लॉकडाउन काळातील बाजार बघितला असेल. त्यावेळी वादळात झाडाची पाने उडून जावीत तसे शेअर बाजारात शेअर कोसळत होते. निफ्टि 12600 होता तो कमी कालावधीत अगदी कोसळून 8000 पर्यन्त आला. आणि महत्वाचं म्हणजे त्यावेळेस INDIA VIX 20 होता तो 80 पर्यन्त गेला. गणिती मास्तराच्या भाषेत सांगायचं तर INDIA VIX आणि NIFTY हे एकमेकांशी व्यस्त प्रमाणात संबंधित आहेत. म्हणजे VIX वाढला की NIFTY पडणार! किंबहुना पडलाच पाहिजे!
हे सुद्धा वाचा! शेअर मार्केट म्हणजे काय? ते कसे काम करते ? Share market in Simple marathi
ग्राफमधील संबंध: VIX आणि बाजाराची चंचलता:
खालील ग्राफमध्ये पाहू शकता! हा ग्राफ जर तुम्ही व्यवस्थित तुलना करून पाहिला तर लक्षात येईल की तेजी-मंदी मध्ये INDIA VIX ची काय भूमिका असते. साधारणपणे मार्च 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्धं सुरू झालं आणि INDIA VIX ने परत डोकं वर काढलं होतं. याशिवाय 2023 च्या शेवटच्या सहा महिन्यात बाजारात जी मोठी तेजी झाली त्यावेळी हा INDIA VIX 10 ते 12 च्या आसपास होता. आणि अगदी अलीकडे तीन राज्यांचे निवडणूक निकाल, केरळमधील कोरोंनाची बातमी आल्यावर INDIA VIX हा 16 पर्यन्त गेला होता.
ट्रेडर्ससाठी INDIA VIX निर्देशांक महत्त्वाचा का आहे?
शेवटी, ट्रेडर्ससाठी INDIA VIX वर लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा निर्देशांक आपल्याला बाजारातील संभाव्य अस्थिरतेबद्दल माहिती देतो. त्यामुळे, आपण ट्रेडिंगच्या वेळी अधिक सजग राहून निर्णय घेऊ शकतो.
VIX वापरून ट्रेडिंग स्ट्रॅटेजी:
VIX म्हणजे काय आणि तो कसा काम करतो? VIX म्हणजे Volatility Index, जो शेअर बाजारातील अस्थिरतेचे मोजमाप करतो. याला सामान्यतः “भीतीचा निर्देशांक” असेही म्हणतात कारण तो बाजारातील गुंतवणूकदारांच्या भीतीचे आणि अस्थिरतेचे प्रतिबिंब असतो. VIX वाढला की बाजारात अस्थिरता वाढण्याची शक्यता अधिक असते, आणि तो कमी झाला की बाजारात स्थिरता येण्याची शक्यता असते.
VIX चा वापर ट्रेडिंगसाठी महत्त्वाचा ठरतो कारण तो आपल्याला बाजाराच्या संभाव्य बदलांचा अंदाज देतो. चला VIX वापरून काही ट्रेडिंग स्ट्रॅटेजी बघूया.
हे सुद्धा वाचा! शेअर बाजारात खरच फायदा होतो का ?
1. VIX वर आधारित ऑप्शन ट्रेडिंग:
VIX चा वापर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये महत्त्वाचा ठरतो. जर VIX जास्त असेल तर बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता येण्याची शक्यता असते. अशावेळी ऑप्शन बायिंग स्ट्रॅटेजी म्हणजेच कॉल किंवा पुट ऑप्शन्स विकत घेणे फायदेशीर ठरू शकते. कारण मोठ्या अस्थिरतेमुळे ऑप्शन प्रीमियम देखील वाढतात, ज्यामुळे ऑप्शन विकत घेणाऱ्यांना फायदा होऊ शकतो.
तसेच, जर VIX कमी असेल तर बाजारात स्थिरता येण्याची शक्यता असते, अशावेळी ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजी म्हणजेच ऑप्शन विकणे फायदेशीर ठरू शकते. कमी अस्थिरतेच्या बाजारात ऑप्शन्सची वैल्यू कमी होते, ज्यामुळे ऑप्शन सेलर्सला फायदा मिळू शकतो.
2. VIX वर आधारित हेजिंग स्ट्रॅटेजी:
VIX निर्देशांकाचा वापर हेजिंगसाठीही केला जाऊ शकतो. जर तुमच्याकडे काही मोठ्या पोजिशन्स असतील आणि VIX वाढत असल्याचे दिसत असेल, तर तुम्ही पुट ऑप्शन्स खरेदी करून तुमच्या पोर्टफोलिओचा हेज करू शकता. हे तुम्हाला बाजारातील अनिश्चिततेपासून संरक्षण देऊ शकते आणि तुमचे नुकसान मर्यादित करू शकते.
3. VIX आणि रिव्हर्सल स्ट्रॅटेजी:
VIX च्या चढ-उतारांवर आधारित रिव्हर्सल स्ट्रॅटेजी देखील वापरली जाऊ शकते. जेव्हा VIX अतिशय उच्च पातळीवर पोहोचतो, तेव्हा सामान्यतः बाजारात मोठ्या प्रमाणात भीती असते, पण अशा वेळी बाजारात रिव्हर्सल होण्याची शक्यता देखील वाढते. त्यामुळे, VIX ने एखाद्या उंचावर पोहोचल्यानंतर, बाजारात रिव्हर्सलसाठी तयार राहणे आणि खरेदीच्या संधी शोधणे उपयुक्त ठरू शकते.
4. VIX वर आधारित स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी:
VIX वर आधारित स्विंग ट्रेडिंग ही एक लोकप्रिय स्ट्रॅटेजी आहे. जर VIX वाढत असेल, तर बाजारात कमी कालावधीत मोठे बदल होण्याची शक्यता असते. अशा वेळी स्विंग ट्रेडर्सना तेजीच्या किंवा मंदीच्या शॉर्ट टर्म पोजिशन्स घेण्याचे अवसर मिळू शकतात. स्विंग ट्रेडर्स VIX च्या ट्रेंडनुसार तेजी किंवा मंदीचे ट्रेड प्लान करू शकतात आणि त्यानुसार छोटे-छोटे परंतु नियमित नफा मिळवू शकतात.
5. VIX आणि पोजिशन साइजिंग:
VIX च्या पातळीनुसार तुमच्या पोझिशन्सचे आकार (Position Size) ठरवणे ही एक महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे. जर VIX जास्त असेल, तर बाजारात अस्थिरता वाढली आहे असे समजावे, त्यामुळे मोठ्या पोजिशन्स घेणे धोकादायक ठरू शकते. अशा वेळी लहान पोजिशन्स घेणे अधिक सुरक्षित ठरते. उलट, जर VIX कमी असेल, तर बाजारात स्थिरता आहे असे समजून तुम्ही मोठ्या पोजिशन्स घेऊ शकता.
6. VIX आणि अल्गोरिदमिक ट्रेडिंग:
अल्गोरिदमिक ट्रेडिंगमध्ये VIX चा वापर करून बाजारातील अस्थिरतेचा अंदाज घेऊन स्वयंचलित (automated) ट्रेडिंग सिस्टीम्स वापरल्या जाऊ शकतात. काही अल्गोरिदम्स हे VIX च्या पातळीवर आधारित विविध ट्रेडिंग सिग्नल्स जनरेट करतात आणि त्या आधारावर बाजारात Enter होतात किंवा बाहेर पडतात. त्यामुळे, ट्रेडर्सना अधिक वेगाने आणि अचूक निर्णय घेणे शक्य होते.
निष्कर्ष:
VIX हा एक महत्त्वाचा निर्देशांक आहे जो बाजारातील अस्थिरतेचे अचूक प्रतिबिंब दाखवतो. VIX च्या आधारावर तुम्ही विविध ट्रेडिंग स्ट्रॅटेजी अवलंबू शकता, जसे की ऑप्शन ट्रेडिंग, हेजिंग, रिव्हर्सल ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, पोजिशन साइजिंग, आणि अल्गोरिदमिक ट्रेडिंग. VIX कडे लक्ष देऊन ट्रेडिंगचे निर्णय घेणे तुम्हाला बाजारातील अनिश्चिततेमुळे होणारे नुकसान टाळण्यास मदत करू शकते.
तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा आणि शेअर बाजाराशी निगडीत अजून माहिती येथे वाचा!
Disclaimer: या लेखातील माहिती केवळ शैक्षणिक आणि सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करा आणि योग्य प्रमाणपत्र असलेल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या. rupayachikatha.com या माहितीच्या अचूकतेसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटच्या यशस्वितेसाठी जबाबदार नाहीत. इन्व्हेस्टमेंटमध्ये जोखीम असते आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. कृपया सावधगिरीने आणि आपल्या जोखमीची क्षमता ओळखूनच इन्व्हेस्टमेंट करा