‘बालदिन विशेष’ मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी Children’s Mutual Fund’

Children's Mutual Fund
Children’s Mutual Fund

मुलांच्या भविष्याचा विचार करणारा गुंतवणूक पर्याय: Children’s Mutual Fund

म्युच्युअल फंड मध्ये काही ‘स्पेशल पर्पज’ फंड्स सुद्धा असतात. त्या फंड्सचे टार्गेट आणि गोल्स निश्चित असल्याने त्याची आखणी त्यापद्धतीने केलेली असते. उदाहरण द्यायचं झालं तर Wealth Creation, Retirement Planning, Tax Planning, आणि Children’s Future Planning असे विविध गोल्स असू शकतात. या प्रत्येक गोल्ससाठी वेगवेगळे फंड्स उपलब्ध असतात. आर्थिक गरजेनुसार हे फंड्स निवडता येतात.

14 नोव्हेंबर हा ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आपण स्पेशल पर्पज फंड असलेल्या Children’s Mutual Fund बद्दल जाणून घेणार आहोत.


हे देखील वाचा: SWP: खात्रीशीर मासिक उत्पन्नासाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना! 


 

Children’s Mutual Fund म्हणजे काय?

या कॅटेगरीच्या म्युच्युअल फंडची खासियत अशी की यामध्ये जी गुंतवणूक केली जाते ती थेट लहान मुलांच्या नावे होत असते. अगदी तीन महिन्यांपेक्षा अधिक वय असणार्‍या बालकांच्या नावाने गुंतवणुकीची सुरुवात करता येते. गुंतवणुकीची रक्कम ही आई किंवा वडील यांच्या खात्यातून किंवा Legal Guardian च्या खात्यातून करावी लागते. या फंड मध्ये गुंतवणूक केली तर त्याला लॉक असतं. एकदा गुंतवणूक केली तर किमान 5 वर्षे पैसा काढता येत नाही. या फंडची मॅच्युरीटी मुलांचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर होते.


Children’s Mutual Fund का निवडावा?

या फंडची आखणी मुलांच्या भवितव्याचा विचार करून केली गेली आहे. मुलांच्या शिक्षणाच्या वेळेस चांगली रक्कम हाती असावी आणि त्याचे प्लॅनिंग करता यावे म्हणून हा फंड फायदेशीर ठरतो.

हे देखील वाचा: मोठ्या रकमेची गुंतवणूक कशी करावी?

गुंतवणुकीची गरज का आहे?

शैक्षणिक महागाईचा वाढता दर लक्षात घेता भविष्यातील शैक्षणिक खर्चाची तरतूद आज केली तर भविष्यात मुलांच्या शिक्षणात अडथळा येणार नाही. म्हणूनच हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन या फंड मध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे.


परतावा कसा असेल?

Children’s Mutual Fund मध्ये SIP आणि Lumpsum असे दोन्ही गुंतवणूक पर्याय आहेत. उदाहरणार्थ:

  • एकत्रित गुंतवणूक 5,00,000₹ केली तर 15 वर्षांनंतर परतावा 45 लाख मिळू शकतो.
  • 5000₹ SIP केली तर 15 वर्षांनंतर 30 लाख मिळू शकतो.
  • सलग 5 वर्षे 50,000₹ प्रतिवर्षी गुंतवणूक केली तर 15 वर्षांनंतर परतावा 20 लाख रुपये मिळू शकतो.


हे देखील वाचा: शेअर बाजारात खरच फायदा होतो का  ? 


या फंडची विशेष वैशिष्ट्ये:

  • रिटर्न्स: सामान्य Equity किंवा Hybrid फंडप्रमाणेच येथे रिटर्न्स मिळतात.
  • फ्रीडम: या फंडमध्ये SIP कधीही स्टॉप किंवा कमी-जास्त करता येते.
  • लॉक-इन: विनाकारण पैसे काढले जात नाहीत, त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक राखली जाते.

Children’s Mutual Fund चे इतर फायदे:

  • पालकांना 80C कर सवलत मिळवून देतो.
  • मुलांच्या शिक्षणासाठी थेट गुंतवणूक.
  • फक्त 500 रुपयांपासून सुरुवात करता येते.
  • वाढदिवशी किंवा इतर वेळेस ऑनलाइन गिफ्ट स्वरूपात गुंतवणूक वाढवता येते.

हे देखील वाचा: एक गुंतवणूक कथा!


Children’s Mutual Fund कोणासाठी उपयुक्त?

  • मुलांचं शिक्षण हाच गुंतवणुकीचा फोकस असेल तर.
  • मोठी रक्कम वारसा स्वरूपात पुढील पिढीपर्यंत देण्यासाठी.
  • टॅक्स प्लॅनिंग व दीर्घकाळ गुंतवणुकीचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी.



गुंतवणूक सुरू करण्यासाठी लागणारी कागदपत्रे:

पालकांचे कागदपत्रे:

  1. पॅन कार्ड
  2. आधार कार्ड
  3. बँक चेक
  4. पासपोर्ट फोटो
  5. मोबाइल नंबर व ईमेल अड्रेस

मुलांची कागदपत्रे:

  1. बर्थ सर्टिफिकेट अर्थात जन्म दाखला

FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न):

1. Children’s Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्याचा फायदा कोणता आहे?
Children’s Mutual Fund हा मुलांच्या शिक्षणासाठी योग्य निधी एकत्र करण्याचा मार्ग आहे. यामध्ये शैक्षणिक महागाईचा प्रभाव कमी होतो.

2. Children’s Mutual Fund ची मॅच्युरीटी केव्हा होते?
या फंडची मॅच्युरीटी मुलांचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर होते, म्हणजेच त्यावेळी रक्कम थेट मुलांच्या नावे दिली जाते.

3. SIP सुरू करून किती कमी गुंतवणूक केली जाऊ शकते?
या फंडमध्ये SIP ची सुरुवात फक्त 500 रुपयांपासून करता येते.

4. Children’s Mutual Fund चे लॉक-इन किती काळासाठी आहे?
गुंतवणूक लॉक-इन 5 वर्षांचा असतो.

5. गुंतवणूक सुरू करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
पालकांचे पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक चेक, फोटो, तसेच मुलांचे जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे.


तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा आणि शेअर बाजाराशी निगडीत अजून माहिती  येथे वाचा!

Disclaimer: या लेखातील माहिती केवळ शैक्षणिक आणि सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करा आणि योग्य प्रमाणपत्र असलेल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या. rupayachikatha.com या माहितीच्या अचूकतेसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटच्या यशस्वितेसाठी जबाबदार नाहीत. इन्व्हेस्टमेंटमध्ये जोखीम असते आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. कृपया सावधगिरीने आणि आपल्या जोखमीची क्षमता ओळखूनच इन्व्हेस्टमेंट करा.

Scroll to Top